मला साधारण पाच वर्षापूर्वी Buccal Mucosa हा तोंडाचा कर्करोग झाला होता, मी नाशिक येथील HCG Manvta Cancer Center मध्ये जाऊन डॉ.राजेंद्र धोंडगे, प्लास्टिक सर्जन यांची प्रथम भेट घेतली त्यांनी डॉ.राज नगरकर याचे समवेत मला मार्गदर्शन करुन तात्काळ सर्जरी करणेबाबत सांगितले व ते काय काय बाबी करणार आहेत याचेही मार्गदर्शन करुन मला धीर दिला. माझी सर्जरी व तद्नंतर आवश्यक त्यासर्व चाचण्या, त्यानुसार रेडिऐशन व किमोथेरपी ही पूर्ण झाली. मी यातून पूर्ण बरा झालो असून आजअखेर माझा डॉ.राजेंद्र धोंडगे यांचेशी संपर्क असून नियमित तपासणी व उपचार त्यांचेकडे घेत आहे. डॉ.धोंडगे हे अत्यंत निष्णात प्लॉस्टिक सर्जन असून स्वभावाने ही अत्यंत नम्र व मनमिळावू आहेत. त्यांचेकडे येणाऱ्या रुग्णाना धीर देऊन नियमित मार्गदर्शन ते करीत असतात. डॉ.धोंडगे हे अत्यंत आवश्यकता असलेस मोबाईलद्वारेही मार्गदर्शन करतात. डॉ.धोंडगे यांनी माझे चेहऱ्यावर प्लॉस्टिक सर्जरी करुन मला पूर्वी प्रमाणे चेहरा दिला आहे. माझ्या आंतररुग्ण कालावधीत डॉक्टर हे दिवसातून तीन वेळा भेट देऊन तब्येतीची पाहणी नियमित करीत असत, डॉ.राजेंद्र धोंडगे यांच्या रुपाने मला देवच भेटला होता. आजही मी गेल्यावर त्यांचेकडून कायम हसतमुख चेहऱ्याने स्वागत केले जाते. डॉ.राजेंद्र धोंडगे यांचे मार्गदर्शन असेच माझ्यासारख्या असंख्य लोकांना लाभो ही प्रार्थना व माझ्याकडून त्यांच्या या कार्यास शुभेच्छा. धन्यवाद.
Read more